Video : तेंव्हापासून कुटुंबावर पवारसाहेबांचे बारीक लक्ष : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मोठे चुलते आप्पासाहेब पवार यांचे २००० साली निधन झाल्यावर कुटुंबप्रमुख म्हणून सर्वस्वी जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली आणि तेव्हापासून पवारसाहेबांचे कुटुंबावर बारीक लक्ष असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सांगितले.  

पुणे : मोठे चुलते आप्पासाहेब पवार यांचे २००० साली निधन झाल्यावर कुटुंबप्रमुख म्हणून सर्वस्वी जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली आणि तेव्हापासून पवारसाहेबांचे कुटुंबावर बारीक लक्ष असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

अजित पवार पुढे म्हणाले, 'शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ते शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर कसे उभे करायचे याबाबत साहेब नेहमी विचार करत असतात. 'राजकीय जीवनात साहेबांनी विविध पक्षात मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. साहेबांना सर्वच पक्षात एक चांगला मान आहे. अगदी सुरवातीच्या काळात वयाच्या ३७ व्या ३८ व्या वर्षी त्यांना पुलोद सरकारची मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी देशभरातील मोठमोठ्या नेत्यांना जवळ करण्याचे काम पवार सांहेबांनी केले असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम.. 

पवारसाहेब हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हाताखाली तयार झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवायचे हे त्यांना चांगलं माहित आहे. विरोधाला विरोध न करता राज्याचे आणि देशासोबत जनतेचे हित कसे साधता येईल याकडे लक्ष देण्याकडे त्यांचा कल असतो. पवारसाहेबांनी काम करत असताना  जातीपातीचा विचार न करता राजकारण केलेले आहे. तसेच, त्यांनी कधीही ठराविक विभागाचा किंवा भागाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आहे.

शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास

देशपातळीवरही काम करताना असा कुठलाही विचार न करता देश म्हणून साहेबांनी देशाचा एकत्रित विचार केलेला आहे. स्वतःच्या राजकीय जीवनात नेहरू सेंटर, वायबी सेंटरसारख्या संस्था देशपातळीवर पोहोचविण्याचे काम पवार साहेबांनी केले. क्रीडा क्षेत्रातही साहेबांचे मोठे योगदान असून ते विसरता येणार नाही. आलेल्या कोणत्याही संकटावर मात कशी करावी हे साहेबांकडून शिकायला हवे, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Statement on Sharad Pawars Birthday