"यापुढे अर्थखातं टिकेल की नाही...?"; अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar News
Ajit Pawar News
Updated on

Ajit Pawar News: अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर शिंदे गट नाराज होता. या नाराजीचे कारण होते अर्थखातं. या अर्थखात्यावरुन चांगलच राजकारण घडलं होतं. अखेर शिंदे गटाची नाराजी दूर करत अर्थखातं अजित पवार यांचेकडे देण्यात आले. आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे अर्थखातं चर्चेत आले आहे.

अजित पवार यांच्यापूर्वी अर्थखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. दरम्यान अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हे अर्थखातं आपल्याकडे राहील की नाही, असे अजित पवार म्हणाले. माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळे आपल्याला झुकतं माप, असे देखील अजित पवार म्हणाले. बारामतीत ते एका कार्यक्रमात बोलत होते. (Latest Marathi News)

"अजित पवार आज मंत्रिडळात आहेत. त्यांच्या हातात राज्य सरकारचे अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं परंतू हे पुढे टिकेल नाही टिकेल हे माहिती नाही. पुढचं कोणी सांगितलं", असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News
Jyeshtha Gauri Pujan: मुस्लीम कुटुंबाच्या घरातही गौरीचे आगमन! विधीवत साजरा केला ज्येष्ठा गौरीचा उत्सव...

अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार नाराज आहेत का?, अशी देखील चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोनदा बंद दाराआड चर्चा केली. विशेष म्हणजे या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग नव्हता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असूनही उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या गावी बारामतीत होते. अजित पवार यांनी शहा यांच्या उपस्थितीपासून दूर ठेवणे हे आगामी राजकीय घडामोडींचे संकेत असल्याची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे.

Ajit Pawar News
INDIA : ''इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा होणार'', मोठ्या नेत्याचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com