उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

Ajit pawar tweet after taking oath as Deputy CM
Ajit pawar tweet after taking oath as Deputy CM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (ता. ३०) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घतल्यानंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, आज विधानभवनात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली आहे.

अजित पवार म्हणाले, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. देशाची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखेन. कामे निष्ठेनं पार पाडेन. कामाबाबतची गोपनीयता पाळेन,अशी प्रतिज्ञा केली. 

पस्तीस वर्षानंतर उदगीरला मिळाले मंत्रिपद
 

तत्पूर्वी, राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार झाला असून, उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली.

राजभवनात झालेल्या भव्य कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर आज सकाळी शिक्कामोर्तब झाले. या कार्यक्रमाला शपथ घेतलेले मंत्री आपल्या कुटुंबीयांसह हजर होते.

शपथविधीच्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित होते. भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये सर्वांत विशेष चेहरा म्हणजे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव होते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com