Ajit Pawar : अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर; गोंधळ होण्याची चिन्हे, मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत
Ajit Pawar visit to chhatrapati sambhaji nagar today maratha reservation protest political news
Ajit Pawar visit to chhatrapati sambhaji nagar today maratha reservation protest political news Esakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान मराठा समाजाकडून अजित पवारांच्या दौऱ्याव विरोध केला जात आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केले आहे.

त्यामुळे या संमलेनाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार हे सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी दाखल होतील. त्यानंतर ते दोन ठिकाणी खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास संभाजीनगर जिल्ह्याची आढाव बैठक घेणार आहेत.

Ajit Pawar visit to chhatrapati sambhaji nagar today maratha reservation protest political news
म्हणे मी दिलेला शब्द पाळणारा माणूस...; अजित पवारांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत आव्हाडांनी दिले थेट आव्हान

आंदोलकांना घेतलं ताब्यात

अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या आंदोलकांनी अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाचं पत्र दिलं होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गंगापुरात न येण्याचे आवाहन या पत्रातून करण्यात आले होते.

Ajit Pawar visit to chhatrapati sambhaji nagar today maratha reservation protest political news
IND vs AUS : भारत 2019 पासून हे करतोय; युवा संघाने परंपरा राखली; विश्वविजेतेही रोखू शकले नाहीत

आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्याठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतःचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना शासनाने अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com