Vidhan Sabha 2019 : 'अजित पवार बारामतीतून निवडणूक लढविणार' (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Saturday, 28 September 2019

राजकारण सोडणार नाही 

- पवारसाहेबांनी जर बारामती लढविण्यास सांगितले तर मी लढवेनही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. त्यांनी जर बारामती लढविण्यास सांगितले तर मी लढवेनही, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच पवारसाहेबांनी मला सांगितलंय की मी सांगेन तसं करावं लागेल, असेही अजित पवार म्हणाले. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनीदेखील यावर भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवार यांच्याशिवाय बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही पर्याय नाही. अजित पवार बारामती विधानसभा निवडणुकीत एक लाखाच्या मतांनी निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. याशिवाय राज्य सहकारी बँक गैरव्यवहाराची चौकशी व्हायला हवी. या चौकशीनंतर सर्वकाही पुढे येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

अजित पवारांच्या डोळ्यांत पाणी, आमच्या कुटुंबात का गृहकलह करता : पवार

राजकारण सोडणार नाही : अजित पवार  

राजकारण सोडण्याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, मी राजकारण सोडणार नाही. राजकारण सोडण्याबाबत असे मी कधी काहीही बोललो नाही. पवारसाहेब सांगतील त्याला बारामतीतून उमेदवारी मिळेल.

माझ्यामुळे पवारसाहेबांची बदनामी झाली : अजित पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar will contest assembly election from Baramati Constituency