Winter Session Maharashtra : ठरावातील शब्दरचना अन् चुकीच्या व्याकरणावर अजित पवारांचं थेट भाष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Season

Winter Session Maharashtra : ठरावातील शब्दरचना अन् चुकीच्या व्याकरणावर अजित पवारांचं थेट भाष्य

आज कर्नाटकविरोधात ठराव मांडण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. आज दुपारी २ वाजता सीमावादावर ठराव मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमचा सीमावादाच्या ठरावाला पाठिंबा आहे. ठराव एकमतानं मंजूर करु असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

तर विरोधी पक्षनेते अजित पवार कर्नाटक विरोधात मांडल्या जाणाऱ्या ठरावाच्या मसुदयावर आक्षेप घेतला आहे. ठरावाचा मसुदा काल न दाखवल्यामुळे अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, चर्चा न करता ठराव एकमताने मंजूर करण्याचं ठरलं होतं.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, फडणवीस यांनी सादर केलेला ठराव जर बारकाईने पहिला तर त्यामध्ये दिसून येईल की मराठीचे अनेक चुकीचे शब्द वापरले गेले आहेत. त्यामध्ये व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. ठरावाची वाक्यरचना देखील चुकली आहे. तर ठरावाच्या शेवटचा भाग अर्धवट वाटतोय.

हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: ठरलं? लोकसभेसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार

पुढे ते म्हणाले प्रचलित पद्धतीनुसार आपण ठराव एकमताने मंजूर करतो त्यानंतर तो जशाच्या तसा केंद्राकडे पाठवतो. अशातच हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. या ठरावाच्या मागे राज्याच्या भावना आहेत. त्यामुळे ठराव अतिशय योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. अशा प्रकारे मराठीची दुर्दशा करणारा ठराव मांडून राज्यातील जनतेची, सिमाभागातील नागरिकांची आणि मराठी भाषेची थट्टा करत आहे का? असा सवाल करत त्यांनी हा संपूर्ण ठराव दुरुस्त करून आणावा आणि नंतरच तो मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा: Winter Season: मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर फडणवीसांच अजब उत्तर; सभागृहात एकच हास्यकल्लोळ