चित्रपट महामंडळाकडून  दादासाहेबांना अभिवादन 

चित्रपट महामंडळाकडून  दादासाहेबांना अभिवादन 

मुंबई - भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना १५० व्या जयंतीवर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. 

दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

महामंडळाचे सचिव सुशांत शेलार, सहसचिव विजय खोचीकर, संचालक सतीश रणदिवे, सतीश बिडकर, शरद चव्हाण, अभिनेत्री वर्षा उसगावकर, चैताली डोंगरे आदींसह मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. राजेभोसले यांनी दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. महामंडळाच्या ‘चित्रशारदा’ मासिकाचे प्रकाशन वर्षा उसगावकर यांच्या हस्ते  करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com