esakal | Akola: वन्यजीव आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यजीव आराखडा

अकोला : वन्यजीव आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त असणाऱ्या जंगलातील वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राज्याच्या वनखात्याने तयार केलेल्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला मंगळवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अखेर मंजुरी देण्यात आली. हा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

धोकाग्रस्त प्रजातीचे संवर्धन, वन्यजीवांचा अवैध व्यापार, मानव-वन्यजीव संघर्ष व बचाव, वन्यजीवांचे आरोग्य व्यवस्थापन, जलीय परिसंस्था संवर्धन, सागरी किनारपट्टी व सागरी जैवविविधता संवर्धन, वन्यजीव पर्यटन व्यवस्थापन व जनजागृती, वन्यजीव संवर्धनात लोकसहभाग, वन्यजीव संशोधनासाठी सबलीकरण, वन्यजीव क्षेत्र व कृती आराखड्यानुसार काम करण्यासाठी निधीची उपलब्धता आणि तसे जाळे तयार करणे आदी बारा विषयांचा आराखड्यात समावेश आहे.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

हा आराखडा तयार करण्यासाठी माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली वरील १२ विषयांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये उच्चस्तरीय वनाधिकारी व संबधित क्षेत्रात कार्य करणारे तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. यामधील वन्यजीव संवर्धनात लोकसहभाग व जनजागृती या विषयात आराखडा तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीमध्ये एशिया मासिकाचे संपादक व राज्य वन्यजीव सल्लागार समिती सदस्य बिट्टु सहगल, कोल्हापूर येथील राज्य वन्यजीव सल्लागार समिती सदस्य व वन्यजीव अभ्यासक सुहास वायंगणकर, अकोल्यातील निसर्गकट्टाचे संस्थापक अमोल सावंत व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपवनसंरक्षक पियुषा जगताप यांचा समावेश होता.

या समितीने वन्यजीव संवर्धनात लोकसहभाग व जनजागृती शालेय अभ्यासक्रमातून निसर्ग शिक्षण देणे, राज्यात जैवविविधता उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व्याख्या केंद्र, मिनी प्राणीसंग्रहालय इत्यादी संवर्धन शिक्षण, निसर्ग व्याख्यान आणि पायाभूत सुविधा आणि क्षमता विकसित करणे आणि प्रोत्साहित करणे. शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी क्रीयाप्रकल्प इत्यादींद्वारे वन्यजीव आणि त्याच्या कायदेशीर स्थितीचा विशेष संदर्भ घेऊन शाळांमधील औपचारिक शिक्षण कार्यक्रमांमध्ये सुधारणा आणि विस्तार करणे अनौपचारिक पर्यावरणीय शिक्षण, वन्यजीव संवर्धनाशी संबंधित जागरूकता आणि राज्यातील अधिवासाशी संबंधित जागरूकता सुधारणे आणि विस्तारित करणे आणि मीडिया, सोशल मीडिया इत्यादींद्वारे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कसे करावे हे जाणून घेणे.

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

वन्यजीव संरक्षणासाठी संवर्धनासाठी संवेदनशीलता, जागरूकता आणि सहभागी दृष्टिकोन यासह राज्यातील वरील गोष्टी पार पाडण्यासाठी माध्यम आणि तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी सूचना या समितीने केल्या आहेत. निसर्गकट्टाचे शालेय पक्षिमित्र संमेलन, पक्ष्यांचे ज्युस सेंटर इत्यादी अभिनव उपक्रमांची सुरुवात अकोल्यातून झाली व आज महाराष्ट्रातील विविध शहरात हे उपक्रम राबविले जातात. या समितीने दिलेल्या सूचनामुंळे निसर्ग शिक्षण व जनजागृतीमुळे भविष्यात सकारात्मक बदल दिसतील, असा विश्वास अमोल सावंत यांनी व्यक्त केला व या समितीचा सूचनांचा स्वीकार केल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले.

loading image
go to top