‘रन फॉर युनिटी’मध्ये आज सगळेच पोलिस धावणार! प्रत्येक पोलिस ठाण्याला फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची घातली अट; पोलिसांकडून टी-शर्ट, फलकांची खरेदी

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज शुक्रवारी १५० वी जयंती आहे. या निमित्ताने देशभरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये ‘एकता दौड’ होणार आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील सात आणि ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकारी, अंमलदारांनी त्यात सहभागी होणे बंधनकारक आहे. तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ देखील अपलोड करावे लागणार आहेत.
separate police station

police action

ESakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज (शुक्रवारी) १५० वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने देशभरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये ‘एकता दौड’ होणार आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील सात आणि ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकारी, अंमलदारांनी त्यात सहभागी होणे बंधनकारक आहे. तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ देखील अपलोड करावे लागणार आहेत. केंद्र शासनाने तशी अट घातली आहे.

सोलापूर शहरात सात पोलिस ठाणी आहेत. त्यात एमआयडीसी, जोडभावी पेठ, जेलरोड, फौजदार चावडी, सलगर वस्ती, सदर बझार, विजापूर नाका या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनाही या एकता दौडमध्ये धावावे लागणार आहे. यावेळी परिसरातील सामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एकता दौडमध्ये सर्वांची एकी असल्याचे दिसावे, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत एक ते दोन किलोमीटर धावण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ही एकता दौड सुरू होईल. त्यात पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, सर्व पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी-अंमलदार धावणार आहेत.

हाती फलक अन्‌ अंगावर टी-शर्ट

‘एकता दौड’मध्ये धावण्यासाठी पोलिसांसाठी ड्रेस कोड असणार आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या अंगावर पांढरा टी-शर्ट असणार आहे. धावणाऱ्यांच्या हाती फलक असतील. या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अंमलदारांसाठी टी-शर्ट खरेदी केली आहे. तसेच हाती घ्यायचे फलकही तयार करून घेतले आहेत. एकता दौडचे फोटो व व्हिडिओ अपलोड करण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. पोलिसांची शारीरिक तंदुरुस्ती हा एकता दौडचा हेतू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com