
अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे, चांदीवाल अहवालात स्पष्ट
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेले आरोप खोटे आहेत. याबाबत चांदीवाल आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आज मंगळवारी (ता.२६) चांदीवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. (Allegation Making By Parambir Singh On Anil Deshmukh False, Chandiwal Commission Say)
हेही वाचा: राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादेत मनसेला धक्का,दाशरथे भाजपमध्ये करणार प्रवेश
परमबीर सिंग यांनी लेटरबाॅम्बमधून १०० कोटी रुपयांचा आरोप अनिल देशमुखांवर केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: लवकरच सभा घेणार, 'नवहिंदूं'चा समाचार घ्यायचाय - उद्धव ठाकरे
चांदीवाल आयोगाने सचिन वाझे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाब घेण्यात आल्या होत्या. आयोगाच्या अहवालातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचीट देण्यात आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
Web Title: Allegation Making By Parambir Singh On Anil Deshmukh False Chandiwal Commission Say
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..