लवकरच सभा घेणार, 'नवहिंदूं'चा समाचार घ्यायचाय; उद्धव ठाकरेंचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
लवकरच सभा घेणार, 'नवहिंदूं'चा समाचार घ्यायचाय; उद्धव ठाकरेंचा इशारा

लवकरच सभा घेणार, 'नवहिंदूं'चा समाचार घ्यायचाय - उद्धव ठाकरे

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राज्यात सध्या बराच धुरळा उडतो आहे. यामध्ये शिवसेना टार्गेट बनली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच आपण सभा घेणार असून 'नवहिंदूं'चा समाचार घ्यायचाय, असा थेट इशाराच त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना दिला आहे. बेस्टच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. (We have planing to arrange rally for targating navhindu CM Uddhav Thackeray)

हेही वाचा: बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "मला लवकरात लवकर सभा घ्यायची आहे. मग तिथं परत एकदा मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा परत एकदा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नवहिंदू. तेरी कमीज मेरे कमीजसे भगवी कैसे हा त्यांचा पोटशूळ आहे. त्यांचा समाचार मला एकदा घ्यायचाच आहे"

हेही वाचा: नवनीत राणांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र; 24 तासात अहवाल देण्याचे राज्याला आदेश

काहीजण आम्हाला म्हणत असतात की आम्ही हिंदुत्व सोडलंय. हिंदुत्व सोडलंय म्हणजे काय केलंय? सोडायला ते काय धोतर आहे का? आमचं हिंदुत्व हे घंटाधारी हिंदुत्व नाही तर गदाधारी हिंदुत्व आहे. तुम्हाला जर हनुमान चालीसा म्हणायचा आहे तर मला फोन करा आणि घरी या. पण जर तु्म्ही दादागिरी करत असाल तर ती कशी मोडायची हे आम्हाला चांगलं ठावूक आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मास्कसक्ती नसली तरी मास्कमुक्ती झालेली नाही

मुख्यमंत्री म्हणाले, "मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाहीत तोपर्यंत तुम्ही मास्क काढू नका. मागे बोललो आहे ते परत एकदा बोलतो, मास्कसक्ती जरी नसली तरी मास्कमुक्ती झालेली नाही"

Web Title: We Have Planing To Arrange Rally For Targating Navhindu Cm Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top