राज्यपालांच्या कथित पत्राने राजकीय धुळवड..!

राज्यपालांचे ते पत्र बनावट असल्याचे राजभवनाचे स्पष्टीकरण
Nana Patole
Nana Patoleटिम ई सकाळ

मुंबई : राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांची यादी अद्यापही राजभवनाच्या लालफितीत असताना आज २०२० मध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहा सदस्यांची नावे असलेल्या कथित यादीने आज राजकीय धुळवड उडाली.

सरकारने शिफारस न केलेल्या स्वतःच्या अधिकारात सहा सदस्यांनी यादी राजभवनाच्या लेटरहेडवर राज्यपालांनी पाठवली. मात्र सदरचे पत्र बनावट असल्याचा खुलासा राजभवनाच्या वतीने करण्यात आला. मात्र याबाबतची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीचा विषय जवळपास दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाचा ठराव करून राज्यपालांना दोन वेळा बारा सदस्यांच्या नेमणुकीबाबत यादी पाठवली आहे. तरीही राज्यपालांनी अद्याप या नियुक्त्या केल्या नसल्याने राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरू आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या लेटरहेडवर आणि त्यांच्या सहीनिशी असलेले कथित पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिण्यात आले आहे. या पत्रावर २९ सप्टेंबर २०२० ची तारीख आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागांवर वीरभद्रेश करबसप्पा बसवंती, रमेश बाबूराव कोकाटे, सतीश रामचंद्र घरत, संतोष अशोक नाथ, जगन्नाथ शिवाजी पाटील आणि मोरेश्वर महादू भोंडवे यांची शिफारस करीत असून राज्य मंत्रिमंडळाच्या सहमतीने या नावाचा समावेश करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्राच्या शेवटी राज्यपालांच्या नावाची सही आहे. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून सावंत, मुझफ्फर हुसेन, रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर, एकनाथ खडसे, राजू शेट्टी, प्रा. यशपाल भिंगे, आनंद शिंदे, ऊर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी अशी १२ नावांची शिफारस केली आहे. मात्र, राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com