रात्री १२ पर्यंतच परवानगी! सोलापूर जिल्ह्यातील ३००४ मंडळांची आज विसर्जन मिरवणूक; वाहनांसाठी 'असा' आहे पर्यायी मार्ग; बंदोबस्तासाठी सव्वासहा हजार पोलिस

गणपती विसर्जन मिरवणुका गुरुवारी निघणार आहेत. ग्रामीणमधील १८२७ तर शहरातील ११७७ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन गुरुवारी होणार आहे. विसर्जन मिरवणुकीला रात्री बारावाजेपर्यंतच परवानगी असणार आहे.
Ganapati
Ganapatisakal

सोलापूर : गणपती विसर्जन मिरवणुका उद्या (गुरुवारी) निघणार आहेत. ग्रामीणमधील एक हजार ८२७ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन गुरुवारी होणार आहे. विसर्जन मिरवणुकीला रात्री बारावाजेपर्यंतच परवानगी असणार आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेतच विसर्जन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात यंदा ३५०हून अधिक गावात ‘एक गाव एक गणपती’ आहे. तर जिल्हाभरात यावर्षी तीन हजार ३५ सार्वजनिक मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना केली आहे. त्यातील ५१६ मंडळांचे विसर्जन बुधवारी (ता. २७) झाले आहे. एक हजार ८२७ मंडळांच्या मिरवणुका उद्या (गुरुवारी) निघणार आहेत. विसर्जन करताना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विसर्जन ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विजेची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा पोलिसांनी दोन हजार ५४८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यात कलम १०७ अंतर्गत दोन हजार ३५९ तर १४४(२)अंतर्गत ४०७ मिरवणुकीत सहभागी होणार नाही, अशी त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली आहे. कलम १०९ अंतर्गत १४२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सण-उत्सवात सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई ली जाते.

‘ईद-ए-मिलाद’ची मिरवणूक शुक्रवारी

गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादच्या मिरवणुका शुक्रवारी व शनिवारी काढण्याचा निर्णय घेतला आहे. तशी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी २४ मिरवणुका आणि त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी चार मिरवणुका निघणार आहेत. दरम्यान, सार्वजनिक मंडळांनी गणपती मिरवणूक शांततेत काढावी, मोठ्या आवाजाचे वाद्य लावून ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामीणमधील पोलिस बंदोबस्त...

  • पोलिस उपअधीक्षक

  • पोलिस निरीक्षक

  • २९

  • सहायक पोलिस निरीक्षक

  • १०६

  • पोलिस अंमलदार

  • १६००

  • नवप्रविष्ठ पोलिस

  • १५०

  • एसआरपीएफ प्लाटून

  • होमगार्ड

  • ११००

शांततेत मिरवणूक काढावी

गणेशोत्सव आनंदात पार पडला असून शेवटच्या दिवशी सर्वांनी कायद्याचे पालन करून आनंदात व शांततेत मिरवणुका काढाव्यात. कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

मिरवणुकांवर ड्रोन अन्‌ व्हिडिओ कॅमेऱ्यांची नजर

उद्या (गुरुवारी) जिल्ह्यातील अठराशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत. बार्शी, पंढरपूर व अक्कलकोट तालुक्यातील मिरवणुकांवर ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच काही ठिकाणी मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पोलिसांकडे ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी २५ नॉईस लेव्हल मिटर आणि मद्यपान केलेल्यांच्या तपासणीसाठी २५ ब्रेथ ॲनालायझर मशिन देण्यात आल्या आहेत.

सोलापूर शहरात अकराशे मंडळांची निघणार मिरवणूक

सोलापूर : शहरातील ९७ हजार घरगुती तर ११७७ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. उद्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी या मार्गांवरील वाहतूक रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, घरगुती गणेशमूर्तींसाठी नगरानगरांमध्ये एकूण ८३ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत. दुसरीकडे सार्वजनिक मंडळांसह इतरांना मुर्ती विसर्जन करता करण्यासाठी महापालिकेने १४ ठिकाणी सोय केली आहे.

आज शहरातील वाहनांसाठी ‘हे’ पर्यायी मार्ग

गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने उद्या (गुरुवारी) सकाळी सहा ते रात्री १२पर्यंत मार्गात बदल असणार आहे. त्यानुसार विजापूरहून पुणे किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन विजापूर नाक्यावरून नवीन बायपासमार्गे देगाववरून पुढे जाता येणार आहे.

पुण्याकडून विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पूना नाका येथून बायपासमार्गे पुढे जाता येईल. हैदराबादहून पुणे किंवा विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांना नवीन हैदराबाद नाका, जुना हैदराबाद नाका, मार्केट यार्ड, नवीन पूना नाका, नवीन केगाव बायपासमार्गे प्रवास करता येईल. रेल्वे स्टेशन,एसटी स्टॅण्डकडे ये-जा करण्यासाठी विजापूर नाका, आयटीआय पोलिस चौकी, निर्मिती विहार, सलगर वस्ती पोलिस ठाणे, मरिआई चौक, भैय्या चौक, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक ते निराळे वस्तीमार्गे एसटी स्टॅण्ड असे जाता येईल.

तसेच जुळे सोलापूरहून शहरात येणाऱ्या वाहनांना जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, अशोक चौकमार्गे प्रवास करता येणार आहे. बार्शीकडून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी बार्शी रोड टोल नाका येथून खेडमार्गे केगाव ब्रिजमार्गे सोलापूर आणि शहरात जडवाहनांना मिरवणूक संपेपर्यंत बंदी राहणार आहे. या काळात मार्केट यार्ड चौक- जुना बोरामणी नाका- शांती चौक- अक्कलकोट रोड असा मार्ग सुरु राहणार आहे.

सोळाशे पोलिसांचा बंदोबस्त

  • अधिकारी

  • १३३

  • पोलिस अंमलदार

  • १४३०

  • नवप्रविष्ठ पोलिस

  • १५०

  • होमगार्ड

  • ५००

  • एसआरपीएफ तुकडी

अफवांवर विश्वास ठेवू नये

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करून आनंदात व शांततेत मिरवणूक काढावी. सर्व मंडळांना कलम १४९अंतर्गत नोटीस पाठविली असून त्यानुसार सर्वांनी त्याचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये.

- डॉ. दिपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

शुक्रवारी ईद-ए-मिलादच्या तीन मिरवणुका

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विजापूर वेस, नई जिंदगी व शास्त्री नगर येथील तीन ठिकाणाहून ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या मिरवणुका निघणार आहेत. दरम्यान, या मिरवणूक मार्गांवरील गणेश मंडळांनी त्यांचे मंडप व इतर साहित्य तातडीने काढून घ्यावे, जेणेकरून त्या मिरवणुकीला अडथळा होणार नाही, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com