"आलोकनाथ यांना गोवण्यात आले असावे' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे मत सत्र न्यायालयाने आज व्यक्त केले. लेखिका विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात न्या. एस. एस. ओझा यांनी आलोकनाथ यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निकालाची प्रत आता मिळाली आहे. 19 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत आता फिर्याद करण्यात आल्यामुळे काही बाबी अवास्तव असू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीत तफावत आहे. त्यांना घटना आठवते; मात्र दिवस आणि महिना आठवत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तक्रार दाखल करण्यात झालेल्या विलंबाबाबतही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. बलात्कार किंवा लैगिंक शोषणाच्या तक्रारीला विलंब झाला तरी दखल घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी सबळ पुराव्याची आवश्‍यकता आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Aloknath have been implicated in the crime of rape