Alphonso Mango Price : हापूस आंबा अडीच हजार रुपये डझन; वाशी मार्केटला रत्नागिरी, देवगडमधून सर्वाधिक पेट्या रवाना

Konkan mango season price update : कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याला यंदा अडीच हजार रुपये डझन दर मिळत आहे. रत्नागिरी आणि देवगड येथून वाशी मार्केटमध्ये पेट्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
Konkan mango season price update

Konkan mango season price update

esakal

Updated on: 

Hapus mango 2500 per dozen : यंदा रत्नागिरी हापूस बाजारात येण्यास गतवर्षीच्या तुलनेत उशीर झाला आहे. त्यामुळे हंगामातील मुहूर्ताच्या हापूसला सोन्याचा दर मिळत आहे. राजापूर तालुक्यातून वाशी बाजारात पाठविलेल्या तीन पेट्यांमधील हापूस आंब्याला डझनाला १५०० ते २५०० रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावला आहे. फेब्रुवारी महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाशी बाजारात केवळ २० टक्केच आंबा दाखल झाला आहे. त्यातील सर्वाधिक पेट्या देवगडमधील हापूसच्या आहेत, असे तेथील व्यावसायिकांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com