उमेश कोल्हे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; नेमकं काय घडलं?

Amaravati Murder Case 10 people in amravati received threats after nupur sharma post
Amaravati Murder Case 10 people in amravati received threats after nupur sharma post

अमरावती : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट व्हायरल करणाऱ्या अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात मास्टरमाईंड आरोपी इरफान शेख याला न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Amaravati Murder Case 10 people in amravati received threats after nupur sharma post)

नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट केल्याप्रकरणी अमरावतीतील १० जणांना जीवे धमकी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान अशा पोस्ट ज्यांनी हटवल्या आणि माफी मागीतली त्यांना सोडून देण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान यातील एक व्यक्तीचा माफी मागीतल्याचा व्हिडीओ समोर आला.

दरम्यान या प्रकरणी भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे यांनी देखील अमरावती शहरातील 10 लोकांना पोस्ट शेअर केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. परिणामांना सामोरे जायचे नसेल, तर माफी मागा आणि तसे व्हिडीओ पाठवा अशी धमकी देण्यात आली होती, असे अनिल बोंडे म्हणाले.

Amaravati Murder Case 10 people in amravati received threats after nupur sharma post
Video : बंडखोर यामिनी जाधव उभ्या राहताच विधानसभेत EDच्या घोषणा

दरम्यान, अमरावतीतील डॉ. गोपाल राठी यांनी देखील नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट केली होती. तसेच उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागीतली आहे. माझ्यामुळे कोणत्या धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, या पुढे अशी चूक होणार नाही, असेही डॉक्टर राठी यांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटले आहे.

Amaravati Murder Case 10 people in amravati received threats after nupur sharma post
काँग्रेसनं बंडखोर आमदारांना शहाजी पाटील स्टाईलनं डिवचलं; म्हणे, ५० खोके...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com