पाली : सुधागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता.१६) आंबा नदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. भेरव येथील आंबा नदी पुलावरून पाणी गेले. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली. .हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. भेरव येथील आंबा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच शाळकरी विद्यार्थी व नोकरदार वर्गाची गैरसोय झाली. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिलाच दिवस होता. मात्र स्कूल बस व एस टी बसेस नदीपलीकडे अडकून पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली..पुलावर कचरा व घाणपुराच्या पाण्याने वाहून आलेला कचरा, लाकडाचे ओंडके हे भेरव आंबा नदी पुलावर अडकले. त्यामुळे पुलावर मातीचे व कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. मात्र स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अतिश सागळे, सतीश मांढरे यांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते ललित ठोंबरे यांच्या जेसीबी च्या सहाय्याने तो कचरा बाजूला करून वाहनांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला व वाहतूक सुरळीत झाली..Pune News: आलेगाव पुर्नवसन शाळेतील नवोदीत विघार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत.झाड कोसळले, विजेच्या तारा तुटल्याभोर महाड रस्त्यावरील आपटी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खोदकाम केलेल्या मोरीच्या ठिकाणी आज सकाळी झाड रस्त्यावर पडले आहे. यामुळे रस्त्या शेजारील विजेच्या ताराही तुटल्या आहेत. तसेच मोरी येथील काही भाग खचला असून वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. ..भुसावळ बोदवड मार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे पावसाचे पाणी थेट शेतातजळगाव येथील भुसावळ बोदवड मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखील रस्त्यावरचे पाणी जाण्यासाठी उपाययोजना होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कुऱ्हा पानाचे येथे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बंद पाडून आंदोलन सुरूवात केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.