Ambadas Danve : दानवेंच्या निलंबनावर फेरविचार शक्य;सभागृहात आज निर्णय जाहीर होणार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी सभागृहात केलेल्या वर्तनाविषयी सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या निलंबनाच्या केलेल्या कारवाईचा सत्ताधारी पक्षाकडून फेरविचार होण्याची दाट शक्यता आहे.
Ambadas Danve
Ambadas Danvesakal
Updated on

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी सभागृहात केलेल्या वर्तनाविषयी सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या निलंबनाच्या केलेल्या कारवाईचा सत्ताधारी पक्षाकडून फेरविचार होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री व विधान परिषदेचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचे सूतोवाच आज सभागृहात दिले. सभापतींच्या उपस्थित गटनेत्यांसोबत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज याविषयी चर्चा झाली आहे. त्यामुळे संसदीय कामकाज कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील निलंबनाबाबतचा निर्णय उद्या (गुरुवार) सभागृहात जाहीर करतील, असे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

विधान परिषदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव मांडण्यावरून अंबादास दानवे व भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी खडाजंगी झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांबाबत अपशब्द वापरले. या प्रकरणी मंगळवारी विधान परिषेदत भाजपने अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाचा ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर करुन दानवेंवर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, आज प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सदस्य सभागृहात आले. विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत उपसभापतींनी फेरविचार करावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. दानवे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे, आमच्या पक्षप्रमुखांनीही माता-भगिनींची माफी मागितली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, विरोधी पक्षनेत्याशिवाय कामकाज करणे आमच्यासाठी कठीण असल्याचेही परब म्हणाले. मात्र, यावर तत्काळ कोणताही निर्णय देण्यास सभापतींनी असमर्थतता व्यक्त केली. त्यावेळी परब यांनी या संदर्भात निर्णय होईपर्यंत सभागृहात खाली बसून कामकाजात सहभागी होऊ व कामकाज मूकपणे पाहू, असे निषेधाचे शस्त्र वापरले.

उत्तराने समाधान

अनिल परब यांचा पवित्रा पाहून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली. ‘विरोधक दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण संवेदनशील व्यक्ती असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करून निर्णय घेऊ,’ असे गोऱ्हे यांनी सांगितले. त्यावर विरोधकांचे समाधान होऊन बाकावर बसून कामकाजात सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.