Ambernath Car Accident
esakal
अंबरनाथमध्ये अनियंत्रित झालेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघतात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्याचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे.