Amit Shah : अमित शहांची उद्या ‘सह्याद्री’वर बैठक?

निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची रणनीती ठरणार
Amit shah meeting loksabha election startegy mumbai visit politics
Amit shah meeting loksabha election startegy mumbai visit politicsesakal

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला हरविण्यासाठी विरोधक ‘बळ’ वाढविण्याची धडपड करीत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यात निवडणुकांच्या तयारीसाठी विशेष बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी राजकीय समीकरणे, त्याचे फायदे-तोटे, मुंबई महापालिका आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती ठरविली जाण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता.१५) शहा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक होईल.

आगामी लोकसभा निवडणुकीत काहीही करून भाजपला रोखण्याच्यादृष्टीने विरोधकांकडून हालचाली सुरू आहेत. त्यातच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता समीकरणांमुळे नवी राजकीय गणिते आकारला येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १६) नवी मुंबईत शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

शहा मुंबईत आल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. विशेषतः लोकसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारी आढावा घेऊन, या निवडणुकांत ताकद लावून जिंकण्यासाठी नव्या टिपही शहा पक्षाच्या नेत्याला देण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका आणि मुंबई लोकसभेच्या साऱ्या जागा ताब्यात घेण्यासाठी शहा अधिक लक्ष घालणार असल्याचेही दिसून येत आहे. या बैठकीत नवा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनाही बोलावले जाऊ शकते. मात्र, शिवसेनेच्या मोजक्याच तेही स्वतंत्रपणे चर्चा होण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com