Vidhan Sabha 2019 : अमित शहांची सभा रद्द कारण...

Vidhan Sabha 2019 : अमित शहांची सभा रद्द कारण...

पुणे : प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते राज्यभरात दौरे करत आहेत. भाजपचे उमेदवार आणि मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे त्यांना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी आपल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यातच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. त्यांची सभाही झाली. मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या राम शिंदे यांच्या प्रचारासाठी अमित शहा येणार होते. तशी सभा नियोजितही होती. मात्र, मुसळधार पावसामुळे अमित शहा यांना सभा अखेर रद्द करावी लागली. 

अमित शहा यांची सभा व्हावी, यासाठी राम शिंदे यांनी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, त्यांची सभा पावसामुळे आज होऊ शकली नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com