esakal | भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा; अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

amit thackeray

भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा - अमित ठाकरे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : अमित ठाकरे (Amit Thackeray) हे गेल्या काही वर्षांपासून मनसेत (Maharashtra Navnirman Sena) सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडं सध्या मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी आहे. नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर (social media) प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड कुतुहल असून यावेळी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले अमित ठाकरे...

भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा; सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल

रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.

हेही वाचा: अनिल देशमुख प्रकरण : गृहविभागाच्या उपसचिवाला ईडीची नोटीस

अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांचं वत्कृत्व व आक्रमकतेकडे आकर्षित होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील तरुण कार्यकर्त्यांनीही मनसेची वाट धरली होती. या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना केली होती. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न ते पक्षाच्या माध्यमातून मांडत असतात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडं सरकारचं पत्राद्वारे लक्ष वेधलं होतं.

हेही वाचा: राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ८ जिल्ह्यात यलो अलर्ट

loading image
go to top