Amol Mitkari I पोलखोल प्रकरणावर राष्ट्रवादीचा भाजपला टोला, आमदारानं केली काव्यात्मक टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amol mitkari

कारण कोल्हापुरमधील पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय त्यामुळं..

पोलखोल प्रकरणावर राष्ट्रवादीचा भाजपला टोला, आमदारानं केली काव्यात्मक टीका

मुंबई महापालिकेतील (BMC) भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून पोलखोल अभियान सुरू केलं जात आहे. त्यापूर्वीच भाजपच्या पोलखोल रथाची (BJP vehicle Vandalised) अज्ञातांनी तोडफोड करण्यात आली आहे. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडी आणि शिवसेना (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, आता यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपावर पलटवार केला आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, ते काहीही करू शकतात! ते हिंदू मुस्लिमांना आपसात लढवू शकतात! स्वतःच्या गाडीच्या काचा फोडून सहानुभूती मिळवु शकतात ते काहीही करू शकतात, कारण कोल्हापुरमधील पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय त्यामुळे ते काहीही करू शकतात. ते काहीही करु शकतात, ते चालीसापासुन इफ्तारपर्यंत सर्व काही करु शकतात, ते काहीही करू शकतात. असा काव्यात्मक ओळींमधून मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

हेही वाचा: काबूल पुन्हा हादरलं! बॉम्बस्फोटात चार जणांचा मृत्यू, 14 जखमी

हेही वाचा: पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर.., पोलखोल प्रकरणावरून दरेकरांचा इशारा

दरम्यान, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल यात्रेचा शुभारंभ होणार होता. परंतु त्यापूर्वीच या रथाची तोडफोड झाली आहे. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी पोलखोल करत आहोत. त्यामुळे याचा त्रास महाविकास आघाडी सरकारला झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केले आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे. या अभियातून मुंबई महापालिकेत होत असलेला घोटाळा उघड करत आहे. लोकशाही पद्धतीने लोकांसमोर हे आम्ही मांडू शकतो. पण काही गुंडप्रवृत्ती हाताशी धरून आमचं पोल खोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

Web Title: Amol Mitkari Criticism On Bjp Leader Of Polkhol Attack From Unknown People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..