'कुणी कितीही आदळआपट केली तरी महाराष्ट्रात जातीय दंगली भडकणार नाहीत'

'हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची गरज'
politics
politicsgoogle
Summary

'हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची गरज'

राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. मनसेप्रमुख ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण गढूळ केल्याचा आणि धर्माधर्मांत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मशिदींवरील भोंगे उतरवणे आणि हनुमान चालीसा पठण यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनसे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वातावरणाची निर्मित करत असल्याचा आरोप सुरु आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

politics
"बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती हे..."; राउतांचा भाजपावर पलटवार

ट्विटमध्ये त्यांनी एका चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून मिटकरी म्हणतात, महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळआपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली असून राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

politics
राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'

दरम्यान, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या सभेनंतर आता मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होत आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात येत असून औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे. औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या सर्व अटींचं पालन झालं आहे का? नसेल झालं तर कारवाई होणार का याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन सभेदरम्यान झालं का, याची शहानिशा पोलिस करणार आहेत. या सभेची संपूर्ण टेप औरंगाबाद पोलिस ऐकणार असून त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com