"बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती हे..."; राऊतांचा भाजपावर पलटवार | Sanjay Raut on BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut on BJP

"बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती हे..."; राऊतांचा भाजपावर पलटवार

मुंबई : काल राज ठाकरे यांची सभा औरंगाबादेत पार पडली आहे. दरम्यान भाजपाचे माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बूस्टर डोस सभा घेत विरोधकांवर टोला लावला होता. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाबरीच्या वेळी शिवसेना कुठं होती हे तुमच्याच पक्षांच्या नेत्यांना विचारा असं म्हणत राज ठाकरे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

(Sanjay Raut On BJP)

सध्या देशभरात अनेक प्रश्न आहेत. महागाई दिवसेंदिव वाढत आहे, चीन घुसखोरी करत आहे. या प्रश्नावर लोकांचे लक्ष लागू नये म्हणून भाजपाकडून असे काम केले जात आहेत. लोकांच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी माध्यमांना बोलताना केला.

हेही वाचा: ईदच्या मुहूर्तावर 'या' 2 राज्यांची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्त्यात वाढ

"बाबरीचाच जर विषय असेल आणि कुणी म्हणत असेल त्यावेळी शिवसेना कुठं होती तर त्यांच्याच पक्षातील सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारा? आणि त्याकाळातला सीबीआयचा अहवाल तपासा, गुप्तचर खात्याचा अहवाल तपासा त्यानंतर त्यांना कळेल शिवसेना कुठं होती." असं म्हणत सध्याचे प्रश्न बदललेले आहेत, आता बाबरीचा मुद्दा काढून फायदा नाही कारण सध्या राम मंदीर उभं राहत आहे. ते आता मुळ प्रश्नापासून लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला त्यांनी भाजपावर लावला आहे.

काल राज ठाकरेंनी भोंग्यावरुन औरंगाबादच्या सभेत केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "हा कायद्याचा विषय आहे, हे प्रश्न कायद्यानेच सुटतील, कोर्ट, हायकोर्ट, पोलिस व्यवस्था यासंबंधित निर्णय घेतील. तुम्हाला आता काही काम नसल्यामुळे स्वत:च्या राजकीय हितासाठी तुम्ही हे विषय काढत आहात आणि देशातील वातावरण खराब करत आहात." असा टोला त्यांनी लावला आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी 3 दिवस युरोप दौऱ्यावर; जर्मनीच्या चान्सरलसोबत आज चर्चा

दरम्यान काल राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा झाली असून भाजपाची बूस्टर डोस सभा मुंबईत पार पडली. या सभेदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी ही बोचरी टीका केली आहे.

Web Title: Sanjay Raut On Raj Thackeray Devendra Fafanavis Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top