कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमोल मिटकरींची मागणी | Amol Mitkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari
कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमोल मिटकरींची मागणी

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमोल मिटकरींची मागणी

मुंबई : सध्या अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात कंगना म्हणाली, की देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की कंगना रानौतच्या म्हणण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले. ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळालं. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. (Kangana Ranaut)

हेही वाचा: मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीसाठी चंद्रकांत खैरेंकडून महापूजा

माजी आयएएस अधिकारी सूर्याप्रताप सिंह यांनीही प्रसिद्धी मिळाल्यास सोनू सूद बना, कंगना नाही या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

loading image
go to top