माणिकरावांना कालचा रझा अकादमीचा हैदोस दिसला नाही - भाजपा नेता | Amravati violence | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणिकरावांना कालचा रझा अकादमीचा हैदोस दिसला नाही - भाजपा नेता

माणिकरावांना कालचा रझा अकादमीचा हैदोस दिसला नाही - भाजपा नेता

sakal_logo
By
दीनानाथ परब

अमरावती: अमरावतीमध्ये भाजपाने पुकारलेल्या बंदला (Amravati bjp bandh) हिंसक वळण (violence) लागलं आहे. त्रिपुरा येथील मशिदीत झालेल्या नुकसानीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला (Protest) हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने (Bjp) शहर बंदचं आवाहन केलं होतं. पण भाजपाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलय. काही गाड्यांची तोडफोड झाली आहे.

अमरावतीमधील भाजपा नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला, त्या शिवराय कुलकर्णी यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला. "मोर्चेकऱ्यांनी कुठेही दगडफेक केलेली नाही. शांततेत निदर्शन सुरु आहेत. अमरावतीमधील जनतेने स्वयंफुर्तीने बंद पुकाराला आहे. वैद्यकीय सेवा वगळता एकही दुकान उघडं नाही. जाणून बुजून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे" असे शिवराय कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा: सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट

"कालच्या मोर्चाला सरकारने अभय दिल होतं. आता बंद मागे घेणार नाही. जनतेने स्वयंफुर्तीने बंद ठेवला आहे. माणिकराव ठाकरे यांना काल रझा अकादमीने घातलेला हैदोस दिसला नाही. त्याचा साधा निषेध या सरकारने केला नाही. सामान्य जनतेला वाचवायला कोणी तयार नव्हतं. काल लोकांनी मार खाल्ला पण हिंसक प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी कालच्या मोर्चाला अभय दिलं. पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली" असे शिवराज कुलकर्णी म्हणाले.

loading image
go to top