अमरावतीच्या युवतीला मिळाला न्याय; चित्रा वाघ यांनी मानले न्यायालयाचे आभार, म्हणाल्या.. Chitra Wagh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

अमरावतीच्या युवतीला मिळाला न्याय; चित्रा वाघ यांनी मानले न्यायालयाचे आभार

मुंबई: कोरोना काळात टेस्टिंगच्या (Corona Test) नावावर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात एका १९ वर्षीय युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब (Girls Genital Swab)घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गुन्ह्यासाठी न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या न्यायालयाच्या या निर्णयाचे आभार भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मानले आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यात कायद्याची ताकद काय आहे याची प्रचिती आली आहे असे चित्रा वाघ यांनी ट्विट करत अभिनंदन केले आहे.

ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, निर्भया घटनेनंतर याची व्याप्ती केंद्र सरकारने वाढवल्यामुळे हा प्रकार बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये घेण्यात आला. यामुळेच अशा घटनांना न्याय मिळत आहे. या युवतीला न्याय मिळवून देणाऱ्या न्यायालयाचे, तपास अधिकाऱ्यांचे चित्रा वाघ यांनी आभार मानले आहे. महिलांवर होणार्‍या अन्याय व कायद्याची ताकद काय असते हे या निमित्ताने पुढे आली आहे असे ही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: अँटेलिया स्फोटकाचा मास्टर माईंड परमबीर सिंगच; सतेज पाटील

नेमका काय होता प्रकार

२८ जुलै २०२० रोजी याप्रकरणी बडनेरा ठाण्यात युवतीच्या तक्रारीवरून अल्केश देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पीडित युवती नोकरी करत असलेल्या ठिकाणचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना बडनेरा येथील महापालिकेच्या मोदी ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. या लॅबमध्ये अल्केश देशमुख हा लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. पीडित युवतीसह तिची मैत्रीण आणि इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब त्याने घेतले.त्यानंतर पीडित युवतीस तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, आता गुप्तांगाद्वारे स्वॅब घेऊन चाचणी करावी लागेल, असे युवतीस सांगितले. त्यासाठी पीडिता अल्केशकडे गेली. त्यावेळी पीडितेची मैत्रीणही सोबत होती. त्याठिकाणी अल्केश देशमुख याने पीडितेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतला. पीडितेने कुटुंबासह जिल्हा सामान्य रुग्णालयात चौकशी केली असता असा स्वॅब कोणत्याही चाचणीत घेतली जात नसल्याचे कळले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तिने बडनेरा ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविल्यानंतर अल्केशविरुद्ध अत्याचार, विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: Amravati Case Chitra Wagh Thanked The Court Corona Update News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..