
अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पोलिस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टू व्हिलरला आधी फोर व्हिलरने धडक दिली. नंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या हत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिस अधिकाऱ्याची हत्या होत असेल तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल केला जात आहे.