अमरावती : कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून | Amravati crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

अमरावती : कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेतल्यामुळे सुरू असलेला वाद वाढला. त्यामुळे रागाच्या भरात पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा खून (Wife murder) केला. शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी खरपी गावात (Kharapi village) ही घटना घडली. ललिता रामचंद्र सोनाने (वय 35, रा. खरपी), (Lalita sonane) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असल्याचे शिरसगाव कसबाचे ठाणेदार दीपक वळवी यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९५ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

गत पंचवीस ते तीस वर्षांपासून काही आदिवासी दाम्पत्य खरपी गावात शासकीय जागेवर स्थायिक झाले. त्याच ठिकाणी रामचंद्र बलराम सोनारे (वय 40) हा पत्नी, दोन मुले व मुलगी यांच्यासोबत राहत होता. काही दिवसांपासून संशयित रामचंद्र याने पत्नी ललिता हिच्यावर संशय घेणे सुरू केले. त्यामुळे काही दिवसांपासून सोनारे दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद सुरू होते. त्यातून रामचंद्र हा पत्नी ललिता हिला मारहाण करीत होता. शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी मुले मजुरीसाठी घराबाहेर गेली होती.

पती-पत्नी दोघेच घरी असताना त्यांच्यात पुन्हा शिवीगाळ व भांडण झाले. रामचंद्र याने घरातील कुऱ्हाडीने पत्नीच्या पाठीवर सपासप वार केले. त्यात गंभीर जखमी ललिता रामचंद्र सोनारे (वय 35) यांचा घरातच मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर पती मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता. मुलगा घरी आल्यावर त्याला रामचंद्रने पत्नीसोबत वाद झाल्याचे सांगितले. घटनास्थळी आसपासचे लोकही दाखल झाले. प्रसंगावधान ओळखून रामचंद्र तेथून पळाला. मृत ललिता सोनारे यांचा भाऊ राजेश नारू बारस्कर (वय 30, रा. थापोडा, मध्य प्रदेश) यांच्या तक्रारीवरून शिरजगावकसबा पोलिस ठाण्यात संशयित रामचंद्र सोनारे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

घरात आसपासचे लोक जमल्यानंतर तेथून पळालेला मृत महिलेचा पती रामचंद्र याने थेट शिरसगावबसबा ठाणे गाठून पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

-दीपक वळवी , ठाणेदार, शिरसगावकसबा ठाणे.

loading image
go to top