

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात घडला. चैनल क्रमांक १०५ जवळ चंद्रपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या वॅगनआर कारने पुढे जात असलेल्या भरधाव ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.