Prakash Ambedkar : 'वंचित'कडून पाठिंबा पण आनंदराज आंबेडकरांना भरोसा येईना; अमरावतीचा नेमका पेच काय?

नामांकन दाखल करण्याच्या दिवशी वंचितचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नामांकन रॅलीमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना वजा ताकीद देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती, असल्याचा आरोप आनंदराज यांनी केला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal

Prakash Ambedkar : रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी बुधवारी अमरावतीतून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आनंदराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे भाऊ आहेत.

अर्ज दाखल केल्यानंतर वंचितकडून पाठिंबा मिळत नसल्याने तो माघारी घेणार असल्याचं आनंदराज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी एक काढत पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं. परंतु त्याहीनंतर आनंदराज यांनी हे पत्र दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं आहे.

Prakash Ambedkar
Narayan Rane : सभागृहाचं सदस्यत्व नसतानाही सहा महिने मंत्रिपदावर खरंच राहता येतं का? कायदा काय सांगतो अन् प्रघात काय आहे?

वंचितचं पत्र जशास तसं...

मा. आनंदराज आंबेडकर

यांस सप्रेम जयभिम,

अमरावती लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही, असे आपल्याला पक्षाकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या उमेदवाराला अर्ज दाखल करू नये, अशी स्पष्ट सूचना आम्ही दिली व त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यात आलेला नाही.

आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असाल, तर आधी ठरल्याप्रमाणे आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा राहील. त्यामुळे आपण अर्ज मागे घेऊ नये व उमेदवारी कायम ठेवावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही करत आहोत.

रेखा ठाकूर

प्रदेशाध्यक्ष,

वंचित बहुजन आघाडी

Prakash Ambedkar
Loksabha Election 2024 : निवडणूक किस्से! खेकड्याला बेडकाचं उत्तर अन् उंदराला घेऊन गेली घार; राजीव गांधींनी केली होती टीका...

दरम्यान, या पत्रावरुन प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये जुंपली आहे. अमरावतीच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांना दिलेलं समर्थन हे धादांत खोटं आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारं असल्याचं आनंदराज यांचा आरोप आहे.

नामांकन दाखल करण्याच्या दिवशी वंचितचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नामांकन रॅलीमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना वजा ताकीद देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती, असल्याचा आरोप आनंदराज यांनी केला आहे.

तीन दिवस वाट पाहूनदेखील पाठिंबा न मिळाल्याने उमेदवारी मागे घेत असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. मतांची विभागणी होऊन भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचं आनंदराज आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे ते खरंच माघार घेणार की वंचितची मदत घेणार, हे येणाऱ्या काळात कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com