बंदूकधारी अमृता फडणवीसांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवीनच अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हातात नकली बंदूक घेतल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवीनच अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हातात नकली बंदूक घेतल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये शुभेच्छा देताना म्हटले आहे की, 2019 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे. आपण नवीन वर्षात चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टी साध्य करू. ठरवलेल्या गोष्टी प्रयत्न आणि साहसाच्या मदतीने आपण मिळवू, असे त्यांनी म्हटले आहे. हे सांगतानाच त्यांनी #HappyNewYear2019 #HappyNewYear #NewYear2019 हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.
 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी नृत्य केलेला व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला होता. त्यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले होते. त्यानंतर सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता त्यांनी नवीन अंदाजात नवीन वर्षाच्या दिलेल्या शुभेच्छावरून नेटिझन्सच्या काय प्रतिक्रीया येत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Amrita Fadnavis Wishesh New Year On Twitter