फडणवीसांची कारकीर्द संपवण्याची धमकी...! अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात गंभीर खुलासे | Amruta Fadnavis blackmailing extortion case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis: फडणवीसांची कारकीर्द संपवण्याची धमकी...! अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात गंभीर खुलासे

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा यांच्या विरोधात दाखल आरोपपत्रात गंभीर माहिती समोर आली आहे. अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांच्याशी केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत रेकॉर्ड केली होती. 

खंडणीसाठी तयार केलेली  ध्वनिफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची धमकी दिली असल्याचा आरोप जयसिंघानी पिता पुत्रीवर करण्यात येत आहे. 

याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिक्षाने अमृता फडवणवीस यांना पाठवलेल्या धमकीच्या संदेशांचाही समावेश आहे. अनिल जयसिंघानीविरुद्ध  १७ गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे तो ८ वर्षे पोलिसांपासून फरार होता. यामुळे गेल्या काही वर्षांत १००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अनिल जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी संभाषणात केला आहे.

१००० कोटींचे नुकसान -

मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी मे महिन्यात न्यायालयात ७३३  पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ७३३ पानांच्या या आरोपपत्रात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यात याप्रकरणाबाबत अनेक गंभीर खुलासे झाले आहेत.

अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या धमक्यांमुळे तिचे फोन कॉल घेणे बंद केले होते. तसेच तिचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता. त्याबाबत २१ फेब्रुवारीला अनिक्षाने पाठवलेल्या संदेशात तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे तिचे वडील अनिल जयसिंघानी रागावले असल्याचे म्हटले आहे. 

अनिल जयसिंघानी विरुद्ध  १७ गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे तो ८ वर्षे पोलिसांपासून फरार होता. यामुळे गेल्या काही वर्षांत १००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अनिल जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी संभाषणात केला आहे.

फडणवीसांना लक्ष करण्याची धमकी

अनिक्षाने फॅशन डिझायनर असल्याचे सांगून जवळीक साधत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली. याबदल्यात सट्टेबाजांकडून सट्ट्यातून मिळणारे पैसे, तसेच मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले. तसेच बनावट ध्वनीचित्रफीत पाठवून त्याआधारे करीत १० कोटींची खंडणी मागितली होती. 

संबंधीत ध्वनिफीत शरद पवार व उद्धव ठाकरे यांना देतील, तसेच मोदीजींनाही देतील, अशी धमकी अनिक्षाने दिल्याचे तिने पाठवलेल्या संदेशांवरून स्पष्ट होत आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हा एक मोठा राजकीय मुद्दा बनवून फडणवीस याना लक्ष करून त्यांचे उपमुख्यमंत्रीपद गमावू शकतात आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपवू शकतात अशी धमकी दिल्याचा आरोप आरोपपत्रात केला आहे. चॅट्समध्ये जयसिंघानीने अमृता फडवणविस याना ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.