Amruta Fadnavis: 'मी पुन्हा येतेय..' अमृता फडणवीसांनी बनवलं बंजारा समाजासाठी खास गीत, दिलं मोदींना क्रेडिट

आता बंजारा समाजाशी निगडीत गाणं येत असल्याने यावेळी तरी त्यांच्यावर टीका होणार नाही, अशी अपेक्षा आहे. हे गाणं टी-सीरिजकडून लाँच करण्यात येत आहे. टी-सीरिजनेही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गाण्याचा एक प्रोमो शेअर केला आहे.
Amruta Fadnavis
Amruta Fadnavisesakal
Updated on

Amruta Fadnavis Song: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येत आहे. त्यांच्या गायनाबद्दल कायम सोशल मीडियात चर्चा होत असते. आता त्या एक नवीन गीन घेऊन येत आहेत. श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाजासाठी त्यांचं खास गाणं येत आहे. विशेष म्हणजे त्यांनी याचं क्रेडिट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.

अमृता फडणवीस यांची इन्स्टाग्राम पोस्ट

#मी पुन्हा येत आहे…
आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी..............
संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्ताने एक गीत घेऊन..........
संपर्कात रहा .
मैं फिर आ रहीं हूँ ….अपनी संस्कृति और विरासत को आप तक पहुँचाने.....
संत श्री सेवालाल महाराज की जयंती के अवसर पर एक गीत के साथ.......... बने रहिए।

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com