Amruta Fadnavis I 'बाळासाहेबांच्या नावावर रासलीला, मी काही केलं तर....', अमृता फडणवीस यांचे नवं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

'बाळासाहेबांच्या नावावर रासलीला, मी काही केलं तर....', अमृता फडणवीस यांचे नवं ट्विट

'मातोश्री'वर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला. यावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी केलं होतं. यानंतर त्यावर अनेकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. यावरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, त्यांनी आता पुन्हा एकदा आणखी एक ट्विट केलं आहे.

हेही वाचा: उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? अमृता फडणवीसांचा टोला

या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर इथे सर्वजण करतात रासलीला आणि मी काही करायला, बोलायला गेले तर लगेच कॅरेक्टर ढीला, असा का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी काल ठाकरी भाषा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान, आता त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एका नव्या वादाल तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या ट्विट्समुळे अनेकवेळा चर्चेत आल्या आहेत. शिवसेनेच्या नादाला लागाल तर २० फूट खाली गाडले जाल अशी टीका संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केली होती. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता. आता अमृता फडणवीस यांनी ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट करून सरकारला प्रश्न विचारला होता.

हेही वाचा: माझ्यावरील हल्ल्यासाठी ठाकरे सरकारच स्पॉन्सर, सोमय्यांचा आरोप

Web Title: Amruta Fadnavis Delete Yesterday Tweet Criticized New Tweet To Cm Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top