Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले या जमाती... ; अमृतांचं खोचक ट्विट

अमृता फडणवीस यांनी यावेळी टीका करताना एक प्रश्नपत्रिकाच दिली आहे.
Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले या जमाती... ; अमृतांचं खोचक ट्विट

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकावर (MVA Government) जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेकदा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटवरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या (Wine in Supermarkets) निर्णयाचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे.

Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले या जमाती... ; अमृतांचं खोचक ट्विट
वाईनचा निर्णय शेतकरी हिताचा, भाजपचा विरोध का? हसन मुश्रीफांचा सवाल
Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले या जमाती... ; अमृतांचं खोचक ट्विट
सुपरमार्केटमधील मद्यविक्री समाज विघातक; आठवले यांची सरकारवर कडाडून टीका

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावं न घेता खोचक शब्दांत टीका केली आहे. थोडक्यात उत्तरं द्या म्हणत ५० मार्कांची प्रश्नपत्रिकाच त्यांनी सोडवायला दिली आहे. "Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले .....या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?" असा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय. दुसऱ्या प्रश्नात रिकाम्या जागा भरा म्हणत त्यांनी "_____शराब नही होती, हरामख़ोर का मतलब _____है, सुनने में आया है _____नामर्द है" असे प्रश्न दिले आहेत.

अमृता फडणवीस यांनी यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली होती. संजय राऊत, नवाब मलिक, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांवर त्यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा या सर्व नेत्यांवर निशाणा साधल्याने नेमकी या नेत्यांकडून काय प्रतिक्रीया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता या ट्विटमुळे पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com