

Amruta Fadnavis during her interview where she compared Uddhav Thackeray to the ‘Sholay’ jailer and referred to Sharad Pawar as ‘Don’.
esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस राजकारणात नाहीत मात्र त्या नेहमी चर्चेत असतात. आता त्या अनेक गौप्यस्फोटामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक राजकीय घडामोडीबाबत बॉम्ब फोडले आहेत. उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडतील अशी त्यांना शंका होती अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कोणत्या नेत्याला काय उपमा द्याल प्रश्न केल्यानंतर अमृता फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना शोलेमधील जेलरची उपमा दिली, तर शरद पवार यांच्यासाठी प्रसिद्ध हिंदी गाणंही गायलं.