Shivsena : 'बाळासाहेब म्हणालेच होते....',आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची CM शिंदेंवर बोचरी टीका

शिवसेनेत फूट पडल्यापासून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे
Kedar Dighe
Kedar DigheEsakal

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच राजकीय आणि इतर संबधितांच्या यासंबधीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यापासून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर ते सातत्याने भाष्य देखील करताना दिसतात. दरम्यान, नुकतीच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली असून यातून त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या शब्दांची आठवण करून देत एकनाथ शिंदे आणि गटावर हल्लाबोल केला आहे.

Kedar Dighe
Shiv Jayanti : शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला; CM शिंदेंनी नाराज झालेल्या संभाजीराजेंना केलं 'हे' आवाहन

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये केदार दिघे यांनी म्हंटलं आहे की, "शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब... जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा... याच उत्तर आज मिळालं! त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..?याच उत्तर आज मिळालं.दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं... आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील..."

Kedar Dighe
Shivsena Row : "नाव व चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा"; संजय राऊतांचा गंभीर आरोप

"त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल...शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील...घरातील माणसं देखील विरोधात जातील.."

पुढे ते म्हणतात की, "शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते... शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती...उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया...!"

Kedar Dighe
Shiv Jayanti 2023 : हे खपवून घेतलं जाणार नाही…; शिवनेरीवर संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

"ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया...ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या! त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली..."

पुढे ते म्हणतात आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ते सर्वांना आवाहन करताना म्हणतात, 'चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया...हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो...भलेही नेते गेले...,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल...पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल!काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com