पुतीन यांना मोठा झटका; युक्रेनचा दावा ठरला खरा,युद्धात रशियन जनरलचा मृत्यू

पुतीन यांना मोठा झटका
putin
putin Sakal

माॅस्को : युक्रेनच्या मारियपोलला घेरलेल्या रशियन सैनिकांच्या एका जनरलचा युद्धात मृत्यू झाला. यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना झटका बसला आहे. त्यांच्यावर सेंट पीटरबर्गमध्ये शनिवारी (ता.१६) दफनविधी करण्यात आला. या बाबत गव्हर्नरने माहिती दिली आहे. रशियाचे मेजर जनरल व्लादिमीर फ्रोलोव तुकडी आठचे उपकमांडर होते. रशियन मीडियानुसार सेनेची ही तुकडी मारियपोलमध्ये अनेक आठवड्यांपासून तैनात होती. रशियाचे (Russia) सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर अलेक्झांडर बेगलोव म्हणाले, फ्रोलोव यांचा युद्धात एका नायकाप्रमाणे मृत्यू झाला. त्यांनी फ्रोलोव यांचा मृत्यू केव्हा आणि कधी झाला हे सांगितले नाही. रशियाच्या वृत्त संकेतस्थळावर जारी छायाचित्रांमध्ये सेंट पीटर्सबर्ग स्मशानभूमीत फ्रोलोवची कब्रवर लाल आणि पांढरे फुल ठेवले गेल्याचे दिसत आहे. (Russia Ukraine War Russian General Killed In War)

putin
रशिया-भारत मैत्रीचे ॠणानुबंध

युक्रेनने दावा केला आहे, की युद्धात अनेक रशियन जनरल आणि इतर वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत. दुसरीकडे रशियन सुरक्षा दलांनी युक्रेनच्या लिसिचांस्क शहरात तेल शुद्धीकरण केंद्रावर शनिवारी बाॅम्बस्फोट घडवून आणला. त्यामुळे तेथे भीषण आग लागली. या भागाच्या गव्हर्नरने ही माहिती दिली. लुहान्स्कचे गर्व्हनर सेरिही हैदाई म्हणाले, की पहिल्यांदाच तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य केल्याची घटना घडलेले नाही. रशियन सैनिक स्थानिक आपात्कालीन सेवा नष्ट करु इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, की हल्ल्याच्या वेळी तेल शुद्धीकरण केंद्रात इंधन नव्हते आणि तेल सामग्रीला आग लागली.

putin
कोरोनामुळे चीनमध्ये बिकट स्थिती; क्वारंटाईन केंद्रात ना जागा, लोक घरात बंद

युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाने शनिवारी सांगितले, की गेल्या २४ तासांमध्ये आठ प्रदेशांमध्ये- पूर्वेत दोनेत्सक, लुहान्स्क आणि खार्किव, मध्य युक्रेनमध्ये निप्राॅपेत्रोवस्क, पोल्तावा आणि किरोवोहृद तथा दक्षिणेत मिकोलीव आणि खेरसाॅनमध्ये रशियन सैन्याने गोळीबार केला. युक्रेनचे (Ukraine) उपपंतप्रदान इरिना वीरेशचुक यांनी शनिवारी टीव्हीवर सांगितले, की ७०० युक्रेन सैनिक आणि १ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना रशियन सैनिकांनी ओलिस ठेवले आहे. या नागरिकांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक महिला आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com