Video : आनंद महिंद्रा शोधत असलेली नकुसा, सांगली जिल्ह्याची!

टीम ई-सकाळ
Sunday, 8 December 2019

पुणे : महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा कायम त्यांच्या ट्विट्समुळं चर्चेत असतात. नुकतचं त्यांनी एक ट्विट केलं आणि महाराष्ट्रात सगळ्यांची शोधा शोध सुरू झाली. त्या ट्विटमधील महिला कोण आहे याचा शोध आनंद महिंद्रा घेत होते. ही महिला सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळची असल्याचं स्पष्ट झालंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुणे : महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा कायम त्यांच्या ट्विट्समुळं चर्चेत असतात. नुकतचं त्यांनी एक ट्विट केलं आणि महाराष्ट्रात सगळ्यांची शोधा शोध सुरू झाली. त्या ट्विटमधील महिला कोण आहे याचा शोध आनंद महिंद्रा घेत होते. ही महिला सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळची असल्याचं स्पष्ट झालंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

आनंद महिद्रांचं ट्विट
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर नकुसा मासाळ या महिलेचा एक फोटो ट्विट केला होता. त्यांना कोणी तरी व्हॉट्स अपवर हा फोटो पाठवला होता. महिंद्रा बोलेरो चालवणाऱ्या या महिलेची त्यांना माहिती हवी होती. नकुसा मासाळ यांचं शिक्षण फक्त नववी पर्यंत झाल्याचं त्यांना माहिती होतं. त्यांच्या या ट्विटनंतर कोण आहेत या नकुसा? अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कोणाला नकुसा यांच्या विषयी माहिती असेल त्यांनी ती द्यावी, असं आवाहन महिंद्रा यांनी ट्विटरवर केलं होतं. मला त्यांच्याशी संपर्क साधायला मदत करा, असं महिंद्रा यांनी म्हटलं होतं. 

कोण आहेत नकुसा?
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या नकुसा या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळच्या आहेत. मुलगी झाली की तिचं नाव नकुसा ठेवलं जातं. पण, महाराष्ट्रात अशा अनेक नकुसा आहेत. ज्यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवलाय. नकुसा मासाळ ह्या त्यापैकी एक आहेत. कोल्हापुरातून कोकणात भाजी-पाला पुरवण्याचं काम त्या करतात. जे काम करायला अनेक तरुणही तयार होणार नाहीत, ते काम त्या गेली अनेक वर्षे करत आहेत. पाऊस, धूकं अशा कोणत्याही वातावरणात त्या घाट उतरून कोकणात जातात. वीस वर्षांच्या असतानाच त्यांना तीन मुलं झाली. पण, पतीच्या निधनानंतर सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळं त्या डगमगल्या नाहीत. भाजी पाला पोहचवण्यासाठी ड्रायव्हर ठेवला होता. पण, अंबा घाटात धुकं पाहून तो पळून गेला. त्यानंतर स्टेअरिंग हातात घेतल्याचं नकुसा सांगतात. जवळपास 20 वर्षे कष्ट करून त्यांनी गावाकडं स्वतःचं घर बांधलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand mahindra tweet women on bolero is from sangli district