

Anand Shinde Sibuseiso Mpungose Share Success Story Of Nature Conservation And How Support Grew After Starting Their Work
sakal
मुंबई: ‘‘पृथ्वीवर केवळ माणसाचाच अधिकार नाही, आपल्यासोबत वावरणाऱ्या प्राण्यांचादेखील तो आहे, ही गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यायला हवी. केवळ हत्तीच नाही तर शेतकरीदेखील वाचला पाहिजे, कारण तोच मला अन्न देतो. आम्ही १०४ गावांमध्ये गेलो आणि लोकांना निसर्गचक्र काय असते, हे समजून सांगितले. तुम्ही स्वतः हत्तीवर कशा पद्धतीने अवलंबून आहात, हे लोकांना पटवून दिले. लोकांनाही ते पटले, हे आमचे मोठे यश आहे,’’ असे मत ट्रंक कॉल दी वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संस्थापक आनंद शिंदे यांनी मांडले.