
Anganwadi Sevika
esakal
महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस नेहमी कार्यरत असतात. त्यांना आता राज्य सरकारने भाऊबीजेसाठी भेट दिली आहे. यासाठी प्रत्येकी २००० रुपये अशी एकूण ४०.६१ कोटी रुपये निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार आहे. महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.