`अनिल देशमुखांची जामिनाची मागणी बेकायदेशीर'| Anil Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

अनिल देशमुखांची जामिनाची मागणी बेकायदेशीर : ईडी

मुंबई : खंडणी वसुलीच्या (Alleged extortion) आरोपात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जाला ईडीने बुधवारी (ता. ५) प्रतिज्ञापत्राद्वारे विशेष न्यायालयात विरोध केला आहे. अनिल देशमुख यांची जामिनाची मागणी बेकायदेशीर (Demand for bail is illegal) असल्याचे ईडीने म्हटले आहे.

ईडीने (Ed) अनिल देशमुख यांच्या विरोधात निर्धारित वेळेत म्हणजे साठ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे डिफॉल्ट जामीन मंजूर करण्याची अनिल देशमुख यांनी केलेली मागणी बेकायदेशीर आहे, असा दावा ईडीने केला आहे. ईडीने जरी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असले तरी अद्याप त्याची दखल न्यायालयाने घेतलेली नाही. त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आपसूकच डिफॉल्ट जामीन मंजूर होतो, असा दावा देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी केला होता.

हेही वाचा: ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

अनिल देशमुख यांच्यासह अकरा जणांवर ईडीने (Ed) आरोपपत्रात दाखल केले आहे. बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या मार्फत हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केल्याचा (Alleged extortion) आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर करण्यात आला आहे. यावर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Anil deshmukhbail
loading image
go to top