
अनिल देशमुखांसह चार आरोपींच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ
मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी कोठडीत असलेले अनिल देशमुख यांच्यासह सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची सीबीआय कोठडी वाढवण्यात आली आहे. १६ एप्रिलपर्यंत त्यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
(Anil Deshmukh CBI Custody Court Order)
याप्रकरणी कोर्टात आज युक्तीवाद करण्यात आला होता. देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी त्यांच्यावतीने युक्तीवाद केला आहे. तसंच सीबीआयने देशमुख तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. तसंच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत त्यामुळे त्यांच्यासह इतरांचीही कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तसेच देशमुख यांच्याकडून ते उत्तरं देत नाहीत म्हणून कोठडी वाढवणे हे योग्य नसल्याचं वकील चौधरी यांच्याकडून सांगण्यात आलं. तसेच त्यांना विविध आजार असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत या गोष्टींचाही विचार करण्यात यावा असा युक्तीवाद चौधरी यांच्याकडून करण्यात आला होता.
हेही वाचा: उगाचंच भीतीने पोटात गोळा आला होता...; वसंत मोरेंची भावनिक पोस्ट
दरम्यान संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख यांच्यावतीने कोठडी वाढवून देण्याला विरोध केला पण सचिन वाझे यांच्या वतीने वकीलांनी कोर्टाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. मी पोलिस अधिकारी राहीलोय. कोठडी किती महत्त्वाची असते हे मला माहिती आहे असं सांगत वाझे यांच्या वकिलांच्या वतीने त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
तसेच सीबीआयने हे प्रकरण गंभीर असून दोन रिमांडमध्ये तपास पूर्ण होणार नाही असं सांगत सध्यातरी त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयने कोर्टाकडे केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली असून १६ एप्रिलपर्यंत ते सीबीआयच्या कोठडीत असणार आहेत.
Web Title: Anil Deshmukh Cbi Custody Court Order
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..