esakal | अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून वीस मिनिटं चौकशी आणि सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

अनिल देशमुखांच्या जावयाची CBIकडून वीस मिनिटं चौकशी अन् सुटका

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. पण देशमुख यांच्या कुटुंबियांनी डॉ. चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता. कुठलीही माहिती न देता या दोघांना ताब्यात घेतल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे, मात्र आता गौरव चतुर्वेदींना सीबीआयकडून सोडण्यात आलं आहे. सीबीआयकडून त्यांची 20 मिनिटे चौकशी झाली. गरज पडल्यास पुन्हा चौकशी करणार असल्याचंही कळवण्यात आलंय. त्यांचे वकिल आनंद बागा यांची मात्र चौकशी अजून सुरु आहे.

हेही वाचा: '12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा'

अशा प्रकारच्या चौकशीसाठी आधी नोटीस द्यावी लागते, मात्र यासंदर्भातील स्पष्टता अद्याप सीबीआयकडून मिळालेली नाहीये. त्यांना आधी नोटीस देण्यात आली होती का, याबाबतची माहिती अस्पष्ट आहे. मात्र, याआधी देशमुख यांच्या सून राहत देशमुख यांनी आरोप केला हो ता की, "त्यांच्या वरळी येथील घराखाली ८ ते १० लोक एका पांढऱ्या इनोव्हा कारमधून आले. साध्या कपड्यांमध्ये असलेल्या या लोकांनी डॉ. गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलांना जवळील फोन जप्त करुन त्यांना कारमधून घेऊन गेले. यासंदर्भात त्या वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी देखील पोहोचल्या होत्या.

loading image
go to top