
अनिल परब म्हणाले, ३१ तारखेपर्यंत कामावर या; मग चर्चा
मुंबई : मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक प्रयत्न करूनही आंदोलनावर सरकारला तोडगा काढता आलेला नाही. हे सरकारचे अपयश असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी शुक्रवारी विधानसभेत मान्य केले आहे. सोबतच संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. ३१ तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे, असे आवाहनही अनिल परब (Anil Parab) यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलन संपलेले नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीवर आंदोलक ठाम आहेत. ही मागणी मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा: राज्य सरकारला संप मिटवण्यात अपयश; परबांचे मोठे विधान
यामुळे दिवसेंदिवस आंदोलन चिघळत गेले. शुक्रवारी विधान परिषदेत अनिल परब यांनी संपाबाबत निवेदन जाहीर केले आहे. निवेदनात संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. ३१ तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे’ असे म्हटले आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम (Ready to discuss other demands) असल्याने सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही संप सुरूच आहे.
इतर मागण्यांवर चर्चा करण्यास तयार
एसटी कर्मचाऱ्यांना आधीच आर्थिक वाढ दिलेली आहे. आंदोलनादरम्यान आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला कामावर घेतले आहे. सोबतच कारवायाही मागे घेत आहोत. इतर मागण्यांवर चर्चा करण्यास तयारही आहोत, असेही अनिल परब (Anil Parab) म्हणाले.
Web Title: Anil Parab There Is No Discussion Until The Strike Is Over Come To Work Till 31st Ready To Discuss Other Demands
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..