Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

अनेक वर्षांपासून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या प्रकाशात राज्यातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांची गणना केली जाते.
Animals
AnimalsSakal

नागपूर : बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम (प्राणी गणना) हे समीकरण झालेले आहे. बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येत असते. यावर्षी तो कार्यक्रम २३ तारखेला बुद्धपौर्णिमा असताना २२ मे रोजी घेण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धपोर्णीमेच्या मुहूर्त चुकला असल्याची चर्चा रंगली आहे. (Animal computation will not be done on Buddha Poornima this year what exactly happened need to know)

Animals
Modi Hate Speech: PM मोदींवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घाला! सुप्रीम कोर्टाकडून याचिकेची दखल घेण्यास नकार

मुहूर्त चुकल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर कनिष्ठांकडे विचारणा करून त्यांची कानउघाडणी केली. तारखेत २२ ऐवजी २३ मे असा बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रक्रिया पूर्ण झाल्याने २२ मे रोजीच होणार निसर्ग अनुभव कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे.

Animals
Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

वन्यजीवप्रेमींसाठी आनंददायी अनुभव

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात प्राणी गणनेसाठी खास मचाणांची व्यवस्था करण्यात येत आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वन्यजीव प्रेमींसाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय आनंदाचा असतो. पाणवठ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या मचाणावरून रात्रीच्या अंधारात तेथे येणाऱ्या प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे.

Animals
Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना

उन्हाळ्यातच प्राणीगणना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी जिथे पाणी तिथे प्राणी आवर्जून जातात. बुद्ध पौर्णिमेला उन्हाळ्यातील सर्वाधिक चंद्रप्रकाश असलेली रात्र असते. जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात. त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणांवर मुक्काम करतात. रात्री पाण्यासाठी पाणवठ्यावर प्राणी आले की त्यांच्या नोंदी घेतल्या जातात.

Animals
जेवणापूर्वी अन् नंतर चहा-कॉफी घेणं का टाळावं?

अशी होते गणना

- जंगलातील पाणवठ्यांनुसार विभाग केले जातात

- प्रत्येक पा‌णवठ्यावर एक लपण किंवा मचाण उभारले जाते

- एका मचाणावर वनकर्मचारी आणि एक प्राणीप्रेमी बसतो

- दुपारी दोन ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत सलग निरीक्षण केले जाते

- पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचा प्रकार, नर किंवा मादी आणि वेळ याची नोंद घेतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com