Anna Hazare Praises Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या
Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!
Anna Hazare Praises Devendra Fadnavis : अण्णा हजारे यांनी एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ते चांगलं काम करत असल्याचे ते म्हणाले. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Social activist Anna Hazare praises Maharashtra CM Devendra Fadnavis for his simplicity and corruption-free work : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत असून त्यांचा साधेपणा मला आवडतो, असं म्हणाले. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. एकीकडे अण्णा हजारे भाजप सरकारविरोधात बोलत नाही, असा आरोप त्यांच्यावर केल्या जात असतानाच अण्णांनी आता देवेंद्र फडणवीस यांचें कौतुक केल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
