काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या राज्यातील नियुक्‍त्या जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 25 June 2020

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने नऊ जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्‍त्यांची घोषणा बुधवारी केली. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मंजुरीने या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने नऊ जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्‍त्यांची घोषणा बुधवारी केली. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मंजुरीने या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लातूर जिल्हाध्यक्षपदी श्रीशैल मल्लीकार्जुन उटगे; तर लातूर शहरच्या अध्यक्षपदी ॲड. किरण जाधव यांची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी डॉ. कल्याण काळे; तर औरंगाबाद शहराध्यक्षपदी मोहम्मद हिशम उस्मानी यांची नियुक्ती झाली. ठाणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड. विक्रांत चव्हाण, भंडारा जिल्हाध्यक्षपदी मोहन विठ्ठलराव पंचभाई; तर गोंदिया जिल्ह्याध्यक्षपदी डॉ. नामदेव दासाराम किरसन आणि चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश मारोतराव देवतळे व चंद्रपूर शहराध्यक्षपदी रितेश सत्यनारायण तिवारी यांची नियुक्ती झाली आहे.

राज्यातील जिम चालकांवर आली उपासमारीची वेळ

काम मिळत नव्हते, जवळ पैसे नाही, म्हणून कुटुंबाने मारली विहिरीत उडी; पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of appointments of Congress office bearers in the maharashtra state